आ.विक्रमसिंह सांवत यांची बालगाव आश्रमाला भेट

0बालगांव,वार्ताहर :जतचे आमदार  विक्रमसिंह सावंत यांनी बालगाव येथील गुरुदेव आश्रम येथे भेट देऊन  प.पु.श्री.सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी महास्वामीजी यांनी म्हणाले की,तुम्हाला तालुक्यातील सर्व मतदार बहुमताने निवडून दिले आहे.त्यांचे तुमच्यावर खूप मोठे विश्वास आहे.

त्यामुळे त्यांचे काम करा.लोक कल्याण करण्याचे भाग्य तुम्हाला मिळाले आहे.त्यामुळे तुम्ही गरिबांचे कैवारी होऊन तालुक्यातील दारिद्र हटवण्यासाठी काम करा.भविष्यात त्यांचे चांगले फळ तुम्हाला मिळेल.सगळेजणांनी मिळून निवडून आणले आहे.तुम्ही अजून तरुण आहेत.जनतेची सेवा करण्यासाठी मोठा वेळ तुम्हाला मिळणार आहे. Rate Cardतुमचा मतदार संघ सुजलाम,सुफलाम करा,असेही यावेळी सांगितले.

माजी सभापती संतोष पाटील,उपसंरपच रमेश हळके,युवा नेते संतोष अरकेरी,अनिल कोटी,भाऊसाहेब तेलसांग,विठ्ठल चलवादी,सिद्धु तेलसंग,प्रल्हाद यंकची,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


बालगाव : येथे‌ परमपुज्य ज्ञानयोगी सिध्देश्वर स्वामीजीचे आ.विक्रमसिंह सांवत‌ यांनी दर्शन घेतले. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.