वाहनाच्या धडकेत वज्रवाडचा एकजण ठार

0
3



जत,(प्रतिनिधी): जत- बिळूर रोडवर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मोटरसायकल स्वार ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

श्रीशैल बाळाप्पा चिंतामणी (वय 60 वर्षे, रा.वज्रवाड ता.जत) असे ठार इसमाचे नाव आहे.घटना बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी अज्ञात वाहनाविरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.








अधिक माहिती अशी,श्रीशैल चिंतामणी हे बिळूरहून जतकडे येत होते.आर्शिवाद गार्डनपासून जतकडेच्या अर्धा किलोमीटर अंतरावर मोटार सायकल स्वारास अज्ञात वाहनाने ठोकर देऊन वाहन चालक पळून गेला.त्यात श्रीशैल चिंतामणी हे लगतच्या दगडावर आपटले.त्यात त्यांच्या डोक्यास जोराचा मार लागल्याने रक्तस्राव होऊन जागेवर त्यांचा मुत्यू झाला.घटनास्थळावरून काही नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला कळविले.







तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली.रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी श्रीशैल चिंतामणी यांना तपासताच ते मयत झाल्याचे आढळून आले.तात्काळ रुग्णवाहिकेचे डॉ.राहुल पवार यांनी जत पोलीसांना फोनवरून कळविले.पोलीसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.मृत्तदेहावर जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.अज्ञात वाहनाचा तपास पोलीसाकडून घेत येण्यात असून रस्त्या लगतचे सीसीटिव्हीचा आधार घेतला जात आहे.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here