जत,प्रतिनिधी : जत येथील औद्योगिक वसाहतीसह विभागातील औद्योगिक वसाहतीत उद्योग उभे करतो म्हणून नियोजीत उद्देशासाठी भुखंड मिळविल्यानंतर बराच कालावधी लोटल्यानंतरही उद्योग उभारणी न करणाऱ्यांवर कारवाई कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येथील उद्योगाचे सर्वेक्षण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून
कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
काही बोटावर मोजण्याऐवढे
उद्योग सुरू आहेत.अन्य ठिकाणी फक्त इमारती बंद स्थितीत उभ्या आहेत.
त्यामुळे एमआयडीसीतील नावालाच भुखंड बळकावणाऱ्यांमुळे नवीन उद्योजकांना जागेसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योजकांना उद्योगाची उभारणी करण्यासाठी भुखंड तसेच इतर सुविधा दिल्या जातात. मात्र, महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दुरूपयोग करणाऱ्यांच्या संख्येत गत काही वर्षांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
दरम्यान, एकीकडे युवा उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठी झटणाऱ्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून भुखंड मिळत नसल्याची ओरड होत असतानाच, दुसरीकडे गत अनेक वर्षांपासून भुखंड मिळाल्यानंतरही उद्योग उभारणी न करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. औद्योगिक वसाहतीत भुखंड वाटपाची विषमता वाढीस लागल्यानंतर आलेल्या तक्रारी वाढत आहेत.