जत,प्रतिनिधी : भाजपामध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या युवा मोर्चाचे जत तालुका अध्यक्षपदी एकुंडीचे सरपंच तथा जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या रूपाने जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर कार्यकर्त्याला पक्षाच्या स्थान मिळाले आहे.
भारतीय जनता पार्टी जत तालुका कार्यकारिणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाने आज जाहीर करण्यात आली. पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम व्यक्तींना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे..
संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिले गेल्याने तालुक्यातील युवकांत अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.
सध्या बसवराज पाटील हे एकुंडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत.तसेच ते सरपंच परिषदेचे जत तालुकाध्यक्ष सुद्धा आहेत.एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी,जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व,अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्याची कार्यशैली,अभ्यासू व्यक्तीमत्व,उत्तम वक्ता, प्रभावीपणे विषयाची मांडणी करण्याचे कौशल्य अशी बसवराज पाटील यांची जनमानसात ओळख आहे.
निवडीनंतर बोलताना बसवराज पाटील म्हणाले की,हे पद म्हणजे बहुमान नसून एक जबाबदारी आहे,युवा मोर्चाच्या माध्यमातून परिश्रम घेऊन तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्याचे काम मी करणार आहे.माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याने जतचे माजी आमदार विलासराव जगताप, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,तालुकाध्यक्ष सुनिल पवार व सर्वच वरीष्ठ नेत्यांचे आभारी आहोत.