“नगरपरिषदेचा धिक्कार असो” | “तुम्ही खावा पुरणपोळी,आम्ही खातो खरडा भाकरी” दिंव्यागाचा जत नगरपरिषदेसमोर आक्रोश,

0



जत,प्रतिनिधी :”नगरपरिषदेचा धिक्कार असो”,”तुम्ही खावा पुरणपोळी,आम्ही खातो खरडा भाकरी”अशा घोषणांना देत दिंव्यागांनी जत नगरपरिषदेचा परिसर दणाणून सोडत,आक्रोश केला.जत‌ नगरपरिषद हद्दीतील दिंव्यागांचा‌ हक्काचा निधी 2012 पासूनचा मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून हडपण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत युवा नेते विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालया समोर ‘खर्डा भाकरी खात’ प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा निषेध करत आंदोलन केले.








दिंव्याचा निधी लवकरात लवकर देऊ असे आश्वासन देऊनही जत नगरपरिषदकडील प्रलंबित असलेला दिव्यांग कल्याण निधी दिवाळीपूर्वी दिव्यांग बांधवांना दिला नसल्याने आज पाडव्याच्या दिवशी

नगरपरिषदेसमोर हे आंदोलन करण्यात आले.जत शहरातील सुमारे 30 भर दिंव्यागांचा निधी नगरपरिषदेने 2012 पासून अडकविला आहे.निधी मागणाऱ्या दिंव्यागांच्या धमकी देण्यापर्यत काही अधिकारी,पदाधिकाऱ्यांची मजल गेली आहे.नगरपरिषदेच्या स्व:निधीतून देण्यात येणारा निधीचे नेमके झाले तरी काय? असा प्रश्न यावेळी ढोणे यांनी उपस्थित केला.








अधिकारी कागदी घोडे नाचवत इतत्र निधी खर्च केल्याचे सातत्यांने सांगतात.नेमका दिंव्यागांच्या निधी गैरठिकाणी वापरण्यात आलाच कसा,यांचीही चौकशी व्हावी.ऐन दिवाळीत नियतीने सर्वस्व् हरविलेल्या दिंव्यागांना मदत होणे गरजेचे होते.मात्र एकीकडे पदाधिकारी,अधिकाऱ्यांची धुमधडाक्यात दिवाळी साजरी होताना दुसऱ्याबाजून दिंव्यागांच्या घरात अंधकार पसरला आहे.अशा अधंपतन प्रशासाचा आम्ही धिक्कार,जाहिर निषेध करतो आहोत.आता या आंदोलनमुळे इशारा दिला आहे.नगरपरिषदेने तातडीने निधी दिला नाही,तर ता.3 डिसेंबरला जागतिक अंपगदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.





अजिक्यतारां प्रतिष्ठानचे अँड.प्रभाकर जाधव,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,जागर फांऊडेशनचे परशूराम मोरे,खोकीधारक‌ संघटनेचे गौतम ऐवळे,राजू आरळी,प्रहारचे सुनिल बागडे यांनी या आंदोलनाला पांठिबा दिला.राजू वडतीले,म्हाळाप्पा व्हनमाने,भिमराव सूर्यवंशी,तुषार कोळी,बंडू बजनावळे,विजय ऐनापुरे,सुनिल शिंदे,अखिल मुल्ला,सुनिल बंडगर,अतुल कुलकर्णी,उमेश जाधव,मनोज ओसवाल,गणेश साळे,लीयाकत हैंदाबादे,दादासो पवार आदीसह सुमारे तीस दिंव्याग उपस्थित होते.






Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.