जत तहसील कार्यालयाची 100 वर्ष जूनी इमारत लवकरचं जमिनदोस्त होणार

0जत,प्रतिनिधी : संस्थानकालिन इतिहासाची साक्ष असलेले जत तहसिलदार कार्यालयाची चिरेबंद दगडात बांधकाम करण्यात आलेली दुमजली भव्य दिव्य इमारत लवकरच भुईसपाट होणार असून या जागेवर सर्व सोईनेयुक्त अशी प्रशासकीय इमारत उभी राहाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने सर्व ती तयारी केली आहे.  

जत तालुक्याचे केंद्रबिंदू असलेले तहसिलदार कार्यालयाची चिरेबंद दगडात बांधकाम केलेली इमारत ही संस्थानकालिन इमारत असून शंभर वर्षे होऊन गेली तरी ही इमारत आजही भक्कम स्थितीत डौलाने उभी आहे. 

या संस्थानकालिन इमारतीचे बांधकाम करित असताना या संपूर्ण इमारतीसाठी चिरेबंद दगडाचा वापर करण्यात आला आहे.या बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आला असल्याने आजही या इमारतीचा एकही दगड निखळलेला नाही.आजही ही चिरेबंद इमारत भक्कमपणे उभी आहे. 

जत येथे प्रशासनाने तेरा कोटी रूपये खर्चाच्या प्रशासकीय सर्व सोईनेयुक्त अशा भव्य दिव्य इमारत बांधकामासाठी मंजूरी दिली असून आता ज्या ठिकाणी तहसिलदार कार्यालय आहे ती संपूर्ण जागा व या कार्यालयाचा परिसर प्रशासकीय इमारत बांधकामासाठी प्रशासनाने निवडलेली आहे. या प्रशासकिय इमारतीच्या बांधकामासाठी तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 

जत तहसिल आवारात संस्थानकाळापासून पोलीस स्टेशन,तहसिल कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय,पुरवठा विभाग व उपकोषागार कार्यालय अशा कार्यालयासाठी या इमारतीचा वापर करण्यात आला आहे.


Rate Card

 सद्या या संस्थानकालिन इमारतीमध्ये पोलीस लाॅकअप,तहसिलदार कार्यालय,पुरवठा विभाग,सेतू केंद्र,निवडणूक विभाग व तालुका क्रीडा अधिकारी यांची कार्यालये अस्तित्वात आहेत.दुय्यम निबंधक कार्यालय हे खासगी जागेत स्थलांतरीत करण्यात आले असून उपकोषागार कार्यालय व पोलीस स्टेशन ही कार्यालये स्वताच्या शासकिय जागेत कार्यरत आहेत.जत तहसिलदार कार्यालयातील सद्या अस्तित्वात असलेल्या कार्यालयांचे स्थलांतर सुरू असून या कार्यालयात असलेले फर्नीचर व ईतर वस्तू व कागदपत्रे ही अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहेत.संस्थानकालिन इतिहासाची साक्ष असलेली ही इमारत भुईसपाट करण्याची प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून लवकरच ही इमारत भुईसपाट होऊन या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभी राहाणार आहे.जत तहसील कार्यालयाची ही इमारत येत्या काही दिवसात काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.