दिवाळीत 70 मुलांना सुभाषराव गायकवाड यांचा मदतीचा हात | कपड्याचे वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी

0डफळापूर, वार्ताहर : डफळापूरचे‌ सुपुत्र तथा मराठा स्वराज्य संघाचे‌ जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी कोरोना काळात नाईक‌ समाजातील सुमारे 70 मुलांना कपड्याचे‌ वाटप करत सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी भेट कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठा व महत्वाचा सण आहे.गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो.
नाईक‌ समाजातील कष्ठकरी नागरीक आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करतात. या समाजाला मुलभुत सुविधांची गरज असताना प्रेमाची आवश्यकता आहे. याबाबीकडे लक्ष देत त्यांच्या मुलांना मदत मिळावी म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. कोराेनाच्या संसर्गामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवसाय व उद्योग धंदे बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

Rate Card

दानसूर व्यक्तित्व असणारे सुभाष काका यांनी कायम गरजू,कष्ठकरी,गरीब नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.दानसुर व्यक्तित्व म्हणून म्हणून सुभाषराव गायकवाड परिचित आहेत.12 एकर जमिन त्यांनी शासनाच्या कार्यालयासाठी मोफत‌ दिली आहे.विविध मंदिरे,विविध समाजातील विद्यार्थी,गरजू नागरिकांना कायम मदतीचा हात‌ दिला आहे.आज कोरोना काळात अडचणीत असलेल्या नाईक समाजातील सुमारे 70  मुलांना कपड्याचे वाटप करून मदतीचा‌ हात‌ दिला आहे.यावेळी मराठा स्वराज्य संघाचे प्रवक्ते‌ वसंत चव्हाण,ग्रा.पं.सदस्य अजित खतीब,महिला तालुकाध्यक्ष श्रध्दा शिंदे,रमेश शिंदे,धोंडिराम माळी,अमोल पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.डफळापूर ता.जत‌ येथे सुभाषराव गायकवाड यांच्याकडून 70 मुलांना कपडे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.