जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत येथे एकाच कुंटुबातील कोरोनाचे 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.तालुक्यात गुरूवारी नवे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
त्यात डफळापूर येथील 8, जत शहर 2 येथील रुग्णाचा समावेश आहे.तर आज 11 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तालुक्यातील संख्या यामुळे 1758 झाली आहे.सध्या 1647 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 90 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.