गिरगावमध्ये दोन घरे,मंदिरात चोरीदोन लाखाचा मुद्देमाल लंपास ; 5 बंद घरेही फोडली
जत,प्रतिनिधी : गिरगाव ता.जत येथे सात घरे,एका मंदिरात चोरट्याच्या टोळीने धाडसी चोरी करत सुमारे 2 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
अधिक माहिती अशी,गिरवागमध्ये सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद असलेली पाच घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर मसुदा बंदगी यांच्या घरात प्रवेश करत 35 हजार रूपयाचे सोने पळविले.रामचंद्र रविंद्र इंगळे यांच्या घरासमोरील 30 हजार रूपये किंमतीची होडा कंपनी साईन मोटारसायकल पळविली.तर ग्रामदैवत बिरोबा मंदिराचा दरवाज्या तोडून लव्वा लाखाचे सोने व चांदीच्या दोन मुर्त्याची चोरट्यांनी चोरी केली.याप्रकरणी पुजारी देवेंद्र पुजारी यांनी फिर्याद दिली आहे.
घटनास्थळी उपअधिक्षक रत्नाकर नवले,सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी भेट दिली.श्वान पथकालाही प्राचारण करण्यात आले होते.मात्र श्वान काही अंतरावर घुटमळे,फिंगर प्रिटच्या पथकांने चोरट्याचे ठसे घेतले आहेत.चोऱ्यांच्या शोधासाठी पथक नेमण्यात आले आहेत.