जत,प्रतिनिधी : गिरगाव ता.जत येथे सात घरे,एका मंदिरात चोरट्याच्या टोळीने रात्रभर हैदोस घालत धाडसी चोरी करत सुमारे 8 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
बिरोबा मंदिरातील सहा तोळे सोने,दोन किलो चांदीची मुर्ती,सात घरातील सोन्याचे दागिणे,दुचाकीची चोरी पळवून नेहली असून चोरट्यांनी घातलेल्या या हैदोसामुळे गावात भितीचे वातावरण पसरले असून घटनास्थळी श्वान पथकासह,ठसे तज्ञ,विशेष पोलिस पथकांकडून तपास सुरू आहे.