धक्कादायक | संखमध्ये सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पोट कापून घेत आत्महत्या

0

जत,प्रतिनिधी : संख ता.जत येथे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सदाशिव व्हनकडे (वय 66)यांनी आजाराला कंटाळून पोट कापून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला आहे.संख प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.व्हनकडे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले होते.काही दिवस त्यांच्याकडे जत तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार होता.गेल्या अनेक दिवसापासून ते पोटाच्या आजाराने त्रस्त होते.
Rate Card
मंगळवारी रात्री ते एकटेच हॉलमध्ये झोपले होते.पहाटेच्या सुमारास‌ त्यांना त्रास होऊ लागल्याने स्व:ता भुलीचे इंजेक्शन करून घेत त्यांनी पोट कापून घेतले,बराच वेळ रक्तस्राव झाल्याने त्यांचा मुत्यू झाला.
दरम्यान या ह्रदयद्रावक घटनेने संख परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उमदी पोलीस पोहचले आहे.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.