जत,प्रतिनिधी : जत शहरालगतच्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नारू मळा,कांबळे वस्ती,माने वस्ती येथे 1 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सुझलॉन कंपनीचे विद्युत वाहीनीचे पोल वाकून नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे.
थेट रहिवाशी असणाऱ्या घरापर्यत पोल झेपावले आहेत.याबाबत परिसरातील नागरिकांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यापासून या कामाची दुरूस्ती केलेली नाही.
मोठ्या व्होल्टेच विजपुरवठा या विज तारामधून होत आहे. तरीही याकडे गांभिर्याने घेतले जात नाही.एकादी मोठी घटना घडल्यावर प्रशासन संबधित कंपनी जागी होणार काय असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.