जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यात रविवारी दोन गावात तीन रूग्ण असे दिलासादायक चित्र पाहवयास मिळालेले आहे. तर जत शहरात शुन्य रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात आत्तापर्यंत 181 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1774 झाली आहे.तालुक्यात रविवारी कासंलिंगवाडी 2,गुळवंची 1 या दोन गावात तीन रूग्ण सापडले आहेत.तालुक्यात गेल्या 27 दिवसापासून यापूर्वी पेक्षा अत्यंत कमी रूग्ण संख्या असेच चित्र पाहवयास मिळत आहे.