भिलवडी : पोटच्या मुलाचा खून करून, खूनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाषाण हृदयी आईला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.दि.04 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास भिलवडी ता.पलूस येथील भिलवडी सांगली मार्गावर असलेल्या पाटील मळ्याजवळील माळी वस्तीवर एका 13 दिवसीय बालकाचा पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून खून केल्याचे प्रकरण घडले होते.प्रथम दर्शनी सदर खून हा अज्ञात व्यक्तीने केला असल्याचा बनाव करण्यात आला होता.
पोलीसांनी कसून चौकशी करून, पोलीसी खाक्या दाखविताच खूनाचे गुढ उकलले गेले.मयत बालकाची आई ऐश्वर्या अमीत माळी वय 23 हिने गुन्ह्याची कबुली दिल्याने तिला गुरूवार दि.05 नोव्हेंबर 2020 रोजी मा.न्यायालयासमोर हजर केले असता,न्यायालयाने बालकाची आई संशयित आरोपी ऐश्वर्या माळी हिला पोलीस कोठडी सुनावली आहे.हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप हे करीत आहेत.