सावकारी,खंडणी प्रकरणी दोघावर गुन्हा दाखल

0जत,प्रतिनिधी : वैद्यकीय उपचारासाठी घेतलेले पैसे व्याजासह परत करूनही पुन्हा व्याजासाठी तगादा लावल्याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी शरद पांडूरंग सांळुखे रा.विठ्ठलनगर यांनी फिर्याद दिली.किशोर झेंडे(रा.घाडगेवाडी रोड),व संतोष रमेश साबळे(रा.आंबेडकर नगर)अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,फिर्यादी शरद सांळुखे यांने स्व:ता,व पुतणीच्या वैद्यकीय उपचारासाठी किशोर झेंडे यांच्याकडून 2018 ला साडेचार लाख रूपये घेतले होते.त्याचे आजपर्यत व्याजासह साडे नऊ लाख रूपये परत दिले होते.तरीही झेेंडे अजून साडेसतरा लाख रूपयाची मागणी करत होता.तर संतोष साबळे यांच्याकडून 10 लाख रूपये घेतले होते.त्याचे आजपर्यत व्याजासह साडेआठरा लाख रूपये दिले होते.तरीही साबळे याने आणखीन 21 लाख रुपये राहिलेचे सांगत पैसे दे नाहितर 20 गुंठे जागा माझ्या नावावर कर म्हणून सांळुखे यांच्याकडे तगादा लावला होता.त्या त्रासाला कंटाळून सांळुखे यांनी पोलीसात धाव घेतली.पोलीसांनी संशयित झेंडे व साबळे यांच्यावर बेकायदा सावकारी,खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.