डासांचा प्रकोप वाढला ! | नगरपरिषद मात्र झोपेतच!

0



जत,प्रतिनिधी : गत‌ पंधरवड्यात‌ पडलेल्या  पावसामुळे जत शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. पूर्व,उत्तर, दक्षिण भागासह 

विस्तारित भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याला वातावरण पोषक आहे.









त्यात औषधाची फवारणी व फॉगिंग बंद असल्याने डासांचा प्रकोप वाढत आहे.एकीकडे कोरोनाचा प्रभाव खालावत असताना डांसाची‌ संख्या दिवसेन् दिवस वाढत असल्याने डेंगू,मलेरिया,चिकनगुण्याचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरातील प्रमुख भागात डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मुख्य गाव भागात अशीच परिस्थिती आहे.दिवसेन दिवस डासांचे प्रमाण वाढत आहे. 





Rate Card





यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतानाही नगरपरिषद प्रशासनाने डासांना आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रभावी उपाययोजना हाती घेतलेली नाही.त्रस्त नागरिक नगरसेवक अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करतात परंतु कोविंड नियंत्रण कामात व्यस्त असल्याचे सांगितले जाते.









Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.