डॉ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेचा ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रम
माडग्याळ, वार्ताहर : येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेच्या वतीने ‘शिक्षण आपल्या दारी’ मोहिमेस सुरूवात करण्यात आली.
सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचे संस्थापक तथा माजी उमाजीराव सनमडीकर यांच्या प्रेरणेने सचिव डॉ.कैलास सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील माडग्याळ, सोनलकर वस्ती,कोणीकोणूर,मायथळ,सिध्दना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने जेथे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत राहू नये यासाठी मुख्याध्यापक आर.सी.पाटील यांनी प्रयत्न चालविले आहेत.या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
कराजनगी ता.जत येथे शिक्षण आपल्या दारी योजना उपक्रमा अंतर्गत स्वाध्याय पुस्तिकेची वाटप करण्यात येत आहे.