संजय गांधी निराधार समितीचे सदस्य राम पाटील यांचा सत्कार
डफळापूर,वार्ताहर : शिंगणापूर ता.जत येथील कॉग्रेसचे युवा नेते रामचंद्र पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते शाल,श्रीफळ फेटाबांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभाष पाटील,राजेंद्र देशमुख,गोटू शिंदे,श्री.चव्हाण उपस्थित होते.
जत पश्चिम भागातून पाटील यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे.

डफळापूर परिसरातील निराधार नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहिल,असे यावेळी बोलताना रामचंद्र पाटील म्हणाले.
संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रामचंद्र पाटील यांचा सत्कार करताना महादेव पाटील,अभिजीत चव्हाण, दिग्विजय चव्हाण