सुराज्य स्त्रीमहाशक्तीचे

0हरिवंशराय यांच्या ओळी … 

उनकी सृजन का सारा कार्य, उनके भीतर बैठी स्त्रीही करती है। 

स्त्रीही सर्वांगिन समाज सुधारणांची जननी आहे.

तिच्या हृदयात नवनिर्मिती वास्तव करत असते. 

स्त्रीशक्तीने स्वबळावर, स्वकर्तृत्वावर अनेक क्षेत्रात आपला कब्जा निर्माण केला आहे. ती पुरुषा एवढीच तुल्यबळ आहे. इतिहासाच्या गर्भात दडलेल्या आधुनिक स्त्रिया  अन्यायाच्या प्रतिकारास सडेतोड उत्तर देण्याच्या इराद्यानेच जन्म घेतात. कोणतेही क्षेत्र स्त्री शिवाय पूर्ण होऊ शकत नाही हा इतिहास सांगतो. इतिहासकाळात अनेक कर्तबगार धुरंधारिणीने यशस्वी राज्य केलेले आहे. इंदिरा गांधी, श्रीमती भंडारनायके, मार्गारेट थॅचर, शेख हसीना या सर्वजणी देशाच्या पंतप्रधानपदावर उल्लेखनीय कार्यरत राहिल्या आहेत.

Rate Card

   अशाच एक स्त्रीशक्तीने देशावर सुराज्य निर्माण केलेले आहे. तिचे नाव जेसिंडा अर्नडऺ.स्वतःच्या कर्तुत्वावर आपल्या पक्षाला बहुमतात आणून एक हाती सत्ता आणली ती न्यूझीलंडची महाशक्ती जेसिंडा अर्नडऺ. डाव्या विचारसरणीच्या जेसिंडा यांचा हा दुसरा यशस्वी कार्यकाळ आहे. पूर्वीचे सरकार काही पक्ष एकत्र करून निर्माण केले होते. सर्व जगावर कोरोनाचे अधिराज्य असताना न्युझीलँड कोरोना पासून कोसो दूर राहिला.त्याला काबूत ठेवणारी, सुनियोजित नियोजनाने दूर ठेवणारी ,यशस्वी देशाची प्रमुख म्हणून जेसिंडा अग्रस्थानी आहेत. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चेमध्ये माथेफिरूने बेछूट गोळीबार करून निष्पाप लोकांचे बळी घेतले होते. निवडणुकीच्या काळात जेसिंडाने या मुद्द्याला कधीच हात घातला नाही. त्यांनी आपल्या डाव्या विचारसरणीच्या आदर्शासाठी निवडणुका लढवल्या. शक्तिशाली व्यक्ती या दयाळू असतात हे त्यांच्या आदर्शा वरून लक्षात येते.26 जुलै 1980 रोजी जेसिंडाचा न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथे जन्म झाला. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.2001 मध्ये वाई काटो विश्व विद्यालयातून पदवी घेतली.2008 मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट युथ ची अध्यक्ष म्हणून निवड झाली. जगातील सर्वात कमी वयात पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळणारी स्त्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. शाळेमध्ये माओरी ही भाषा अनिवार्य करण्यात तिचे समर्थन होते.2017 मध्ये जेसीडा बिनविरोध निवडून आल्या.7 मार्च रोजी सर्वसंमतीने त्या लेबर पार्टीच्या उपनेता म्हणून निवडल्या गेल्या. पुढे त्या न्युझीलँड लेबर पार्टीच्या प्रमुख नेत्या बनल्या.सर्वात तरुण नेता म्हणून तिची निवड. सामाजिक विषयावर समान लिंग विवाह या बाजूने मतदान करून गर्भपात हा गुन्हा ठरवला.2018 मध्ये समलिंगी गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होणारी पहिलीे पंतप्रधान. दहशतवाद विरोधी लढणारी, युवकांचे समर्थन करणारी, महिला समानता यासाठी संघर्ष करणारी. न्युझीलँड ऑस्ट्रेलियातील ताण-तणाव कमी करण्यात मोठी भूमिका बजावली. पंतप्रधानपदावर बाळाला जन्म देणारी दुसरी पंतप्रधान. न्यूझीलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान. आपल्या मंत्रिमंडळात ग्रीन पार्टीच्या पाच मंत्र्यांना सरकारमध्ये  स्थान दिले. ग्रीन पार्टी व लेबर पार्टीच्या शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा या महामहिम स्त्री नेतृत्वाला मानाचा प्रणाम!

कांबळे चंद्रकांत उमरगा

7038269331

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.