धायगुडे कुटूंबियांना शासकीय मदत मिळवून देऊ ; आ.विक्रमसिंह सावंत

0जत,प्रतिनिधी : सनमडी ता.जत येथील पिंटू उर्फ परमेश्वर धायगुडे या तरुणाचा  भिवर्गी-करजगी रस्त्यावरील पूलावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने बोर नदीच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला होता.सोमवारी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग उपस्थित होते.

आमदार सावंत म्हणाले की,शासनाकडून धायगुडे कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ज्यावेळी पिंटू धायगुडे वाहून गेल्याचे मला समजताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला.यांत्रिक बोट मागविण्यात आल्या,मात्र त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले,पण अपयश आले.दुर्देवी घटना घडली आहे.
Rate Card
धायगुडे यांच्या कुटूंबियांशी ठामपणे उभे राहून शासकीय पातळीवरची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सनमडी गावातील उद्योजक मधुकर नरळे यांनी पिंटू धायगुडे यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची व आरोग्याची जबाबदारी घेऊन माणुसकी जपत सामाजिक योगदान दिले आहे.सनमडी ता.जत येथील पिंटू उर्फ परमेश्वर धायगुडे कुंटुबियांची आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट घेतली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.