संख प्रकल्पाच्या उजव्या कँनॉलची गळती बंद करा ; सुभाष पाटील | जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांना दिले निवेदन

0संख,वार्ताहर : जत तालुक्यातील संख मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कँनॉलला गळतीमुळे त्याखाली येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होतं आहे.ही गळिती बंद करावी अशी मागणी युवा नेते सुभाष पाटील,मल्लिकार्जुन फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी याबाबत जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या जत भेटीच्या वेळी निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील संख येथील मध्यम प्रकल्प तलाव 11 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने तुडुंब भरला आहे. त्यामुळे लिकेज असलेल्या उजव्या कालव्यातून गळती होत आहे.

यांची कल्पना देऊनही पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने कँनॉलचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.Rate Card


तलावात येणारे कोट्यावधी लिटर पाणी वाया जात आहे. गळती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांच्या  जमिनी पाण्याखाली जाणार आहेत. उजव्या कँनॉलचे पाणी भिवर्गी ओढ्यापर्यंत जात आहे.त्यांची दुरूस्ती केल्यास शेतीचे नुकसान टळणार आहे.


 

तसेच सध्या या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी राहुल फुटाणे, सुरेश फुटाणे, विठ्ठल फुटाणे, शिवाण्णा वाघुले, विठ्ठल कलादगी उपस्थित होते.


जत दौऱ्यावर असलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संख प्रकल्पातील कँनॉलमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देताना युवा नेते सुभाष पाटील,शेतीचे झालेले नुकसान

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.