गैरहंगामातही खताचे लिंकिग | जत तालुक्यातील कृषी दुकानातून शेतकऱ्यांची लुट

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना अतिवृष्ठीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची कृषी दुकानातून पुन्हा लुट सुरू झाली आहे.खताचे लिंकीग केल्यास परवाना रद्द होईल म्हणून छातीठोक पणे सांगणारा जत कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे.


जत शहरातील विजापूर रोडवरील एका दुकानदारांने खताचे किंमतीपेक्षा जादा तीस रूपये दिले नाहीत,म्हणून उमराणी येथील राजेंद्र खांडेकर या शेतकऱ्यांला दमदाटी करून खत देण्यास नकार दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी घडला आहे.


जत शहरासह तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीतून शेती करत आहे.निसर्गाचा प्रकोप,शासनाचे दळभद्री धोरण,कृषी विभागाच्या वरकमाईला सोकलेल्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मरणयातना सोसत आहे.

खरीप,रब्बी हंगामात होणारे रासायनिक खताचे लिंकिग आता गैरहंगामातही कायम आहे.जत तालुक्यातील अनेक कृषी दुकानातून हमाली,वाहतूक खर्च म्हणून 30 ते 100 रुपयापर्यत शेतकऱ्यांकडून जादा पैसे आकारत थेट लुटण्याचे प्रकार होत आहेत.


यांचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना माल नाकारणे,दमदाटी करणे येथपर्यत या कृषी दुकानदारांची मजल गेली आहे.तालुक्यातील अनेक कृषी दुकानात रासायनिक खताबरोबर द्राक्ष,डाळिंब व अन्य पिकांसाठी लागणाऱ्या औषधाचे दर वाढविण्यात आल्याचेही आरोप शेतकरी करत आहोत.तालुकाभर कृषी दुकानदारांच्या या कारभाराचा पंचनामा करावा,अशी मागणी आम्ही जिल्हा कृषी अधिक्षक,यांच्याकडे करणार आहोत,अशी माहिती युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.


कोट्यावधीच्या कमाईचे स्रोत 

Rate Card

तपासण्याची गरज.?


जत तालुक्यातील शेतकरी रात्रन् दिवस कबाडकष्ठ करूनही कर्जाच्या खाईतून बाहेर येता येत नसताना,त्यांच्या जीवावर जगणारे कृषी दुकानदारांच्या कोट्यावधीच्या मालमत्ते मागचे गौडबंगाल काय याबाबत चौकशी करण्याची गरज आहे.अशा कृषी दुकानाची गोपनीय तपासणी केल्यास अनेक लुटीचे गंभीर प्रकार समोर येतील.

तक्रार करणार 


मी जत शहरातील एका दुकानात रासायनिक खते व काही औषधे खरेदीसाठी गेलो होता.प्रांरभी माझी मागणीनुसार बिल करण्यात आले.त्यात युरिया व अन्य काही वस्तूचे दर वाढवून लावल्याचे दिसले.मी त्यांना याबाबत विचारणा केली.आमचे दर असेच आहेत,पाहिजे असेलतर घ्या,कोठेही तक्रार करा, अशी उध्दट उत्तरे मला देण्यात आली.जादा पैशाचा जाब विचारला म्हणून मला पाहिजे असलेली औषधे संपलीत म्हणून सांगण्यात आले.उध्दट उत्तरे देत दमदाटी करण्यात आली.या दुकानाची कृषी अधिक्षकाकडे मी तक्रार करणार आहे.


राजेंद्र खांडेकर,शेतकरी• जत तालुक्यात कसे करतात कृषी दुकानदार शेतकऱ्यांची लुट

• कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कशी होते कृषी दुकानाची तपासणी

• शेतकरी कंगाल होताना कृषी दुकानदारांच्या कोट्यावधी उत्पन्नाचे काय आहे गंधक

या सर्व मुद्याचा वास्तविक परिस्थितीची वस्तुनिष्ठ भूमिका मांडणारी वृत्तमालिका लवकरचं…

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.