दरिबडची-मोरडी बंधाऱ्यातील पाणी बागायती शेतात घुसले

0दरिबडची,वार्ताहर : दरिबडची येथील

दरिबडची-मोरडी वस्ती के टी वेअर बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.त्याशिवाय ओढापात्रात पाठीमागूनही पाणी येण्याचा प्रवाह मोठा असल्याने बंधाऱ्या पात्रात पाण्याचा फुगवटा होऊन पाणी बागायत क्षेत्रात घुसत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्याचे दरवाजे उघडावेत अशी मागणी ग्रा.प.सदस्य अमोल शेंडगे यांनी केली आहे.


दरिबडचीतील मोरडी वस्ती येथे बोर नदीपात्रात कोल्हापूर पध्दतीचा बंधारा सहा वर्षापुर्वी बांधण्यात आला आहे.सध्या या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.धुँवाधार पाऊस सुरूच असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी पसरत जाऊन लगतच्या बागायत शेतीत घुसत असून उभी पिके वाहून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी या बंधाऱ्याचे दरवाजे उघडावेत अशी मागणी केली आहे. संबधित विभाग,संख अप्पर तहसीलदार, जत प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.पंरतू अद्याप पर्यत दरवाजे उघडलेले नाहीत.त्यामुळे पाणी गतीने लगतच्या शेतीत घुसत आहे.

Rate Card


दरिबडची जवळील बंधाऱ्यातील पाणी असे बागायत शेतीत घुसले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.