जतेतील आरोग्य केंद्रांना आरोग्य उपकरणाचे वाटप | आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या फंडातून 20 लाखाच्या निधीची उपलब्धता

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कोरोनाला हद्दपार करण्यात आरोग्य विभागाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.तालुक्यातील सर्व डॉक्टर,आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रभावीपणे काम सुरू आहे,त्यांना यापुढेही कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी बळ मिळावे यासाठी आमदार फंड व विक्रम फांऊडेशनच्या माध्यमातून ही आरोग्य साधने दिली आहेत,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.

जत पंचायत समिती येथे जत आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य उपकरणे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सांवत यांच्याहस्ते बेड,ऑक्सीजन मशीन,बिपी मशीन,प्लस मशीन,सँनिटाईझर,एन95 मास्क,गोल्ज आदी 20 लाख रुपयाची उपकरणे कर्मचाऱ्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

आ.सांवत म्हणाले,जत तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कोरोना रुग्ण वाढू नयेत,संसर्ग रोकण्यासाठी झोकून देऊन काम करण्यात येत आहे. 


Rate Card
आमचे सर्व डॉक्टर्सं,आरोग्य कर्मचारी कोरोना योध्दाप्रमाणे लढत आहेत.त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा फैलाव आटोक्यात आहे.अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही.त्यामुळे भविष्यातही अशाच पध्दतीने काम करावे,कोरोनाला हरवायचे आहे,असे आवाहनही आ.सांवत यांनी केले.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे,विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम,उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बडंगर,डॉ.मोहिते यावेळी उपस्थित होते.


जत तालुक्यातील आरोग्य केंद्राना कोरोना साहित्य वाटप करताना आमदार विक्रमसिंह सावंत व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.