विरोधकांनी आमदारांची बदनामी थांबवावी : निवृत्ती शिंदे | बोर नदीतील वाहते पाणी हे तुबची बबलेश्वर योजनेचेच

0

जत,प्रतिनिधी : बोर नदीतील वाहते पाणी हे तुबची बबलेश्वर योजनेचेच आहे.त्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भिवर्गी, बालगाव,सुसलाद आदी गावात बोरनदी ओढापात्रात पाण्याचे पूजन केले आहे.आमचे नेते आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेल्या या कामामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला असून त्यांची पोटदुखी चालू आहे.विनाकारण आमदार विक्रमसिंह सावंत यांची बदनामी करू नये.अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा रोखठोक इशारा उमदीचे काँगेसचे नेते निवृत्ती शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिला.






यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आमचे नेते आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विधानसभा निवडणूक लढविताना जी आश्वासने दिली होती,त्या आश्वासनांची पूर्तता करत आहेत. रस्ते,पाणी, वीज या मूलभूत प्रश्नांना त्यांनी गंभीरपणे घेतले आहे.अशा अनेक विभागात सध्या कामे सुरू आहेत.






त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सध्या कर्नाटकात पावसाने जोर धरला आहे.त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते एम.बी.पाटील यांच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला विनंती केल्यानुसार कर्नाटक सरकारने एक मानवता दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी म्हणून पाणी भिवर्गी व तिकोंडी तलावात पाणी सोडले आहे.



Rate Card





पाणी तलावात आल्यानंतर दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.यापूर्वी पाणी आले नाही,तेव्हा कर्नाटकात पाऊस झालाच नव्हता का? असा प्रतिसवाल देखील शिंदे यांनी केला.यावेळी युवा नेते वहाब मुल्ला, पाणी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिल शिंदे, बंडा शेवाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


                  




बोरनदी ओढापात्रात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नाने तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी आले आहे.यामुळे शेतकरी सुखावला आहे,मात्र विरोधकांची पोटदुखी वाढली असून प्रसिद्धीसाठी चुकीच्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी हे पाणी तुबची-बबलेश्वर योजनेचे नसून पावसाचे पाणी आहे अशा अफवा पसरवण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे विरोधकांनी हे पाणी तुबची-बबलेश्वरचे नसल्याचे सिद्ध करावे आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ.

– रमेश हळके(उपसरपंच,उमदी)




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.