जत पुर्व भागातील गांजाशेती पुन्हा समोर

0

जत,प्रतिनिधी : कर्नाटकात उपलब्ध असणारी बाजारपेठ, कमी कष्टात मिळणारा पैसा,यामुळे जत तालुक्यामध्ये गांजाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले

जाते.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उमराणी (ता.जत) येथे छापा टाकून 147 किलो वजनाचा 17 लाख 76 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केल्यानंतर तालुक्यातील गांजाची चोरटी शेती पुन्हा चर्चेत आली आहे.सीमाभागातील अनेक गावांत

ऊस,मका,तूर,केळी,बाजरी,ज्वारी,सूर्यफूल या पिकांतर्गत गांजा पिकाची लागवड केली जाते.झटपट श्रींमतीच्या हव्यासापोटी शेतकरी या पिकाकडे वळत आहेत.
Rate Cardगांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते.त्यांच्या चोहोबाजूला ऊस,तूर,आदी पिके लावली जातात.पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची पाने तोडून वाळत घातली जातात.कोणतीही  प्रक्रिया न करताच गांजा तयार होतो.सोलापूर,सांगली,पुणे,बारामती,मिरजसह कर्नाटकातील विजापूर,गुलबर्गा,जमखंडी,परिसर येथून गांजा पुरविला जातो.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,जत व उमदी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून अनेकदा परिसरातील गावांमध्ये छापे टाकले जातात.


गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो,आरोपींना पकडले जाते, मात्र आजवर एकाही आरोपीला शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.गांजाविरोधी कारवाई करताना महसूल खात्यातील सक्षम अधिकारी घेऊन छापा टाकणे बंधनकारक असताना,एकाही कारवाईत महसूल अधिकाऱ्याचा समावेश केला जात नाही. त्यामुळेच कारवाईची जरब कमी झाली आहे.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.