जत तालुक्यात कोरोनामुक्त रुग्ण वाढले

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना बाधित संख्येपेक्षा कोरोना मुक्त होणारी संख्या वाढली.गेल्या आठवड्यात तालुक्यात कोरोना मुक्त होणारी संख्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या दुप्पट झाली आहे.परिणामी कोरोनाचा फास काहीसा ढिला होतानाचे चित्र आहे.





तालुक्यात वाढणाऱ्या संख्येला नागरिकात जागृत्तीमुळे मोठा परिणाम स्पष्ट दिसत आहे.जत शहरातील संख्या काहीसी कायम आहे.ग्रामीण भागातील कोरोना प्रभाव कमी होतानाचे चित्र आहे.आरोग्य यंत्रणाकडून तालुक्यात प्रभावी काम सुरू आहे.तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत.त्याशिवाय माझे कुंटुब माझी जबाबदारी मोहिमचेही फायदा होताना दिसत आहे. 



Rate Card




तालुक्यात गुरूवारी 26 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यात कोरोनामुक्त 37 झाले आहे.जत शहर 10,वाळेखिंडी 2,बेवनूर 2,शेगाव 2,डफळापूर 3,दरिबडची 4,उमराणी 1,कंठी 1,जाडरबोबलाद 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्याची संख्या 1446 झाली आहे.तर दुसरीकडे कोरोना मुक्त संख्या 1169 वर पोहचली आहे.तालुक्यात 49 जणांचा मुत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील 228 जणावर उपचार सुरू आहेत.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.