उत्तम चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी निवड

0जत,प्रतिनिधी ; जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण याची संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले उत्तम शेठ यांची पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या शिफारशीतून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी हि निवड केली आहे.

जत राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यशील युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून युवकांचे संघटन वाढविण्याची मोहिम त्यांनी सुरू केली आहे.या सर्वाची दखल घेत त्याची निराधार लोकांना आधार असलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.Rate Card
तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या माध्यमातून मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील,असे निवडीनंतर बोलताना चव्हाण यांनी सांगितले.
 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.