संजय गांधी निराधार योजना समिती जतच्या अध्यक्षपदी नाना शिंदे

0जत,प्रतिनिधी : संजय गांधी निराधार अनुदान योजन समितीच्या जत तालुका अध्यक्षपदी येथे युवा नेते,माजी नगरसेवक सुजय उर्फ नाना शिंदे यांची निवड करण्यात आली.
पालकमंत्री यांच्या शिफारशीनूसार जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी हि निवडीसह समिती गठीत केली आहे.आमदार विक्रमसिंह सांवत यांचे निकटवर्तीय असलेले व सध्या जत कॉग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले सुजय उर्फ नाना शिंदे यांच्यावर आमदार सांवत यांनी ही जबाबदारी सोपविली आहे.


Rate Card
इतर सदस्य असे,कांताप्पा काशीराम बिरूनगी,मीनल धैर्यशील सांवत-पाटील,पिराप्पा मल्लाप्पा माळी,रामचंद्र बाबासाहेब पाटील,गणेश महादेव गिड्डे,अनिल दत्तात्रय पवार,विजय शंकरराव चव्हाण,उत्तम हंणमतराव चव्हाण,सिध्दाप्पा भिमाण्णा शिरसाड यांची निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.