सांगली जिल्ह्यात कोरोना सुरक्षित ग्राम मोहीम प्रभावीपणे राबवा ; जितेंद्र दुडी यांचे आवाहन

0शिराळा : कोरोना पासून सर्वांना  सुरक्षित राखणे हे शासनाचे कर्तव्य आहे.नागरिकांच्या सहकार्याने शासनाची ‘कोरोना सुरक्षित ग्राम ‘  ही मोहीम सांगली जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा ! असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दुडी यांनी मांगले येथे बोलताना केले.

शासनाच्या कोरोना सुरक्षित ग्राम व माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेची सुरुवात  मांगले (ता शिराळा) येथून करण्यात आली.या मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आज या जिल्ह्यातील मोहिमेची सुरुवात  मांगलेतुन करण्यात आली. दि. 5 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या दरम्यान ही आरोग्य मोहीम राबवण्यात येणार आहे. 

कोरोना या व्हायरस पासून बचाव करण्यासाठी’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आरोग्य सेविका, सेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक  यांची टीम आहे. प्रत्येक घरोघरी  नागरिकांचे तापमान, ऑक्सिजन, आरोग्य शिक्षण, व प्रबोधन, तसेच  मास्क ,सॅनिटाईझर वापरणे ,हाथ स्वच्छ धुणे, असे योग्य ते मार्गदर्शन , आरोग्याविषयी  येथील 14 आरोग्य पथके  करतील. 


Rate Card
सांगली जिल्ह्यातील कोरोना सुरक्षित ग्राम मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी जितेंद्र दुडी,तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा परीषद सदस्या अश्विनीताई नाईक

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.