प्रतापूरमधील मोटे कुटूंबियांना मानव मित्र संघटनेने दिला मदतीचा हात

0जत,प्रतिनिधी : प्रतापूर ता.जत येथील लता गुलाब मोटे यांच्या झोपडीत रविवारी गॅस सिलेडरचा स्फोट झाला.रविवारी सकाळी साडेआठ वाजता झोपडीत झालेल्या या स्फोटात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या स्फोटात एक दुचाकी व संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. 

या दुर्घटनेने मोटे कुटूंबांना मोठा धक्का बसला.प्रतापूरमधील मोटे कुटूंबियांना चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने जिवनावश्यक किट व रोख पाच हजार रुपयांची मदत करत मदतीचा हात दिला.

लता मोटे या प्रतापुर गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका झोपडीत व मुलाच्या घरापासून शंभर मिटर अंतरावर एकट्या राहण्यास आहेत.त्या सकाळी काही कामानिमित्त धावडवाडी येथे  गेल्या होत्या.तर त्यांचा मुलगा प्रकाश मोटे हे महमदहुसेन अकबर शेख यांच्या रानात गेले होते.रविवारी सकाळी साडे आठ वाजता गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.

या गॅस सिलेंडरच्या स्फोटात झोपडीचे घर पुर्णपणे जळाले होते. 

यावेळी मानव मित्र संघटनेचे 

प्रशांत कांबळे, रामचंद्र रणशिंगे, विवेक टेंगले,सरपंच माणिक हेगडे,माजी सरपंच  माणिक वाघमोडे,अनिता हिंगमीरे,दिगंबर गोरे, गणेश खांडेकर,शेख सर यांच्यासह मोटे कुटुंबीय उपस्थित होते.Rate Card
मानव मित्र मदतीसाठी कायम अग्रेसर

चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या संकल्पनेतून कार्य करत असलेली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही दुष्काळी जत तालुक्यातील गोरगरिबांच्या मदतीसाठी कायम अग्रेसर राहणार असल्याचे प्रशांत कांबळे, रामचंद्र रणशिंगे यांनी सांगितले


प्रतापूर येथील घटना दुर्देवी ; तुकाराम महाराज 


प्रतापूर येथील गॅस सिलेंडर स्फोटाची घटना ही दुर्देवी आहे. या घटनेत मोटे कुटूंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा दुर्घटना घडल्या की श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही तात्काळ फुल नाही फुलांची पाखली घेत मदतीसाठी सज्ज आहे. मोटे कुटूंबियांनाही मदत करण्यात आली आहे. भविष्यात ही अशा दुर्घटना घडल्यास त्या कुटूंबियांच्या पाठीशी मानव मित्र संघटना कायम उभी राहील असा विश्वास यावेळी चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी दिला.

प्रतापूर,(ता.जत)येथील गॅस सिलेंडरच्या दुर्घटनेतील नुकसानग्रस्त मोटे कुटूंबियांना मदत देताना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.