जत तालूका ज्वारीचे पिक घेण्यात आघाडीवर असायचा मात्र पाऊसाने बगल दिल्याने व पेरणीनंतर पाऊस न झाल्याने काही भागातच ज्वारी पिक बऱ्याप्रमाणात आले आहे.माळरान,कोरडवाहू जमिनीत पाण्या अभावी दोन फुटापर्यत पिके येऊन वाळून गेल्याने तेथे धान्य वैरण तुटवडा आहेच.सर्वाधिक ज्वीरी उत्पन्न येणाऱ्या डोन परिसरात अपेक्षित पिकेच आली नाहीत.मजुरी तर एका बाजूला, पुर्ण दिवस पाचशे तर अर्धा दिवसासाठी चारशे रुपये वर मोजावे लागले; मात्र त्याच्या मोबदल्यात दिवसभरात अवघी 60 ते 70 व अर्धा दिवसात 40 ते 50 पेंडीही निघत नाही. त्याला बांधणीसाठी एका पेडींला तीन रुपये मोजावे लागतात.मोडणीसाठी किमान एक ते दीड रुपये, तर पाचूद्यावरील ही पेंडी गंजीपर्यंतच्या प्रवासाला कमीत कमी दहा रुपयांपेक्षा जास्त खर्च करावे लागतात.याशिवाय गोळा झालेला कडबा गंजीला लावण्यासाठी नाही म्हटले तरी त्यासाठी दीड ते दोन रुपये खर्च झाला.
अशा प्रकारे आपल्याच शेतात तयार झालेला; परंतु या खर्चातून तो हजार ते बाराशे रुपये शेकडा पडल्याने विकतचा चारा घेतल्यागत झाले असल्याचे शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत.खर्च व उत्पन्नाचा लेखाजोखा केलाच तर शेतकर्यांच्या हाती काय शिल्लक राहते, असा प्रश्न निर्माण होतो.ज्वारी दरावरच शेतकऱ्याचे पुढील अर्थकरण ठरणार आहे.