IPL- 2023 | यंदा आयपीएल क्रिकेटमध्ये नवे नियम | नाणेफेकीनंतर कर्णधाराला मिळाला हा अधिकार

0
7

गेल्या काही वर्षात क्रिकेट बघणाऱ्यां शौकिनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.याला कारण ठरले आहे.भारतातील आयपीएल ही क्रिकेट स्पर्धा,कोरोनामुळे गेल्या दोन वर्षानंतरही या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद कायम आहे.यंदा आणखीन रंगत आणण्यासाठी आयपीएलमध्ये नवे नियम आणण्यात आले आहेत.

 

नवीन नियमानुसार यंदा आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधार नाणेफेक झाल्यानंतर खेळाडूंचे प्रभावी नियम जाहीर करणार आहेत. लोकप्रिय आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू होण्या अगोदरच बीसीसीआयने आयपीएलमध्ये जूने नियम बदलून नवे नियम आणले आहेत.

 

यात आता कर्णधारांना नाणेफेकीनंतर त्यांची प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.नाणेफेकीनंतर गोलंदाजी किंवा फलंदाजी करायची या निर्णयानंतर कर्णधार आपला संघ निवडू शकणार आहे.नव्या नियमात तो अधिकार देण्यात आला आहे.आयपीएल २०२३ च्या नवीन नियमानुसार 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना प्रत्येक षटकासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त परवानगी देतात. आणि क्षेत्ररक्षकाने केलेल्या गैरवर्तनामुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.15 खेळाडूंचा संघ शीटला नाव देईल,4 पर्यायांपैकी एक प्रभाव खेळाडू असेल,असे अनेक नव्या नियम आयपीएलला आणखीन प्रचंड प्रसिध्दी मिळू शकणार आहे.

 

आयपीएलचा यंदाचा हंगामाचा ३१ मार्चपासून धुमधडाका सुरू होणार असून, उद्घाटनाचा सामना चॅम्पियन्स गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे.बिसीसीआयने नव्या नियमानुसार नाणेफेकीनंतर,दोन्ही टिमच्या कर्णधारांना त्यांची प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरणारे खेळाडू निवडण्याचे स्वांतत्र दिले जातील,त्यामुळे नाणेफेकीनंतर प्रथम गोलंदाजी किंवा फलंदाजीच्या नुसार आपला सक्षम संघ निवडणे शक्य‌ होणार असून त्यामुळे संघ जिंकण्यासाठी आणखीन स्पर्धा रंगणार आहे. नव्या अहवालानुसार या हंगामात बदलल्या जाणार्‍या इतर 2 नियमांव्यतिरिक्त,संघांना 14 षटके संपण्यापूर्वी प्रभावी खेळाडू आणावे लागतात. दुसरीकडे, इम्पॅक्ट प्लेअरऐवजी जो खेळाडू बाद होईल तो पुन्हा त्या सामन्यात खेळू शकणार नाही. तो खेळाडू बदली खेळाडू म्हणूनही पुनरागमन करू शकणार नाही.एखाद्या संघाने दिलेल्या वेळेत षटके पूर्ण न केल्यास, ओव्हरटाइममध्ये टाकलेल्या ओव्हर्समध्ये फक्त 4 क्षेत्ररक्षकांना 30 यार्डच्या बाहेर ठेवता येईल.

 

 

नाणेफेकीनंतर, दोन्ही संघांच्या कर्णधारांना 4 पर्याय द्यावे लागतात, जे ते सामन्यादरम्यान प्रभावी खेळाडू म्हणून निवडू शकतात.सामन्यादरम्यान यष्टिरक्षक किंवा क्षेत्ररक्षकाने गैरवर्तन केल्यास पंच डेड बॉल घोषित करून विरुद्ध संघाला 5 पेनल्टी धावा बहाल करणे असा नवा नियम आणण्यात आला आहे.आयपीएलमध्ये प्रथम चाहत्यांना अशा नव्या नियमासह अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

 

हेही वाचा-चालताना, खूप वेळ बसल्यावर सांध्ये दुखतात, वेदना असह्य झाल्यात ? ५ रुपयांत मिळवा आराम

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here