श्रीपती शुगरकडून संपूर्ण ऊसबिल जमा

0
2

श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लिमिटेड, डफळापूर या साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे बिल एकरकमी रक्कम २८०० रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री व श्रीपती शुगरचे चेअरमन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

स्वस्तात मरणाची ‘झिंग’ गल्लोगल्ली पोहचली | लहानगे,प्रौढही आहारी,ग्रामीण भागात धुमाकूळ

गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी डफळापूर येथील श्रीपती ॲण्ड पाँवर शुगर लिमिटेड या साखर कारखान्यास ज्या शेतकऱ्यांचा ऊस २९ जानेवारी ते ०८ मार्च २०२३ पर्यंत गाळपास पाठविला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हि रक्कम जमा करण्यात आली आहे. चाचणी हंगामातच कारखाना शेतकऱ्यांच्या व प्रशासनाच्या विश्वासास पात्र ठरला असेही चेअरमन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी संगितले.

विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हैशीही दगावल्या | पहा ‌कुठे घडली घटना

आगामी काळात शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन व साखर उतारा अधिक देणाऱ्या ऊसाच्या जातीच्या बेण्याची लागवड आपल्या शेतामध्ये करण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.महेंद्र आप्पा लाड यांनी केले आहे.कारखान्याने शेती विभागामार्फत येणाऱ्या गळीत हंगाम २०२३-२४ साठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्यास चालू केलेले असून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या नोंदी घेण्यास सुरू केलेल्या आहेत.

सोयाबीन ऑईलचा‌ मोठा साठा, खानापूरात दुध संकलन केंद्रावर अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या नोंदी देऊन आधिकाधिक ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या उत्कर्षात श्रीपती शुगर नेहमीच अग्रेसर राहील असेही सांगितले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी,मुख्य शेती अधिकारी हनमंत धरीगौडा,फायनान्स मॅनेजर संतोष जगताप, केन अकौंटट संजय सुतार व कारखाना कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा..

• बाजार समिती निवडणूक : जत भाजपकडून मोर्चेबांधणी,बैठकांना वेग | संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला पांठिबा

• जतचा नेत्रदिपक नजारा,ढगाची झालर,राष्ट्रीय महामार्गावरून घेतलेला;व्हिडिओ&; एकदा पहाचं..

• जतचा नेत्रदिपक नजारा,ढगाची झालर,राष्ट्रीय महामार्गावरून घेतलेला “व्हि’डि’ओ” एकदा पहाच..

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here