माडग्याळमधील खाजगी डॉक्टरांना कोरोना
जत,प्रतिनिधी : माडग्याळ ता.जत येथील खाजगी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले आहे.
माडग्याळ मध्ये खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टरांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.अखेर मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान बाधित डॉक्टरांना कोठून कोरोनाची लागण झाली हे अस्पष्ट असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

डॉक्टरांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे.संख अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी बाधित परिसराची पाहणी करून आरोग्य पथकांना उपाय योजनाच्या सुचना दिल्या आहेत.
माडग्याळ मध्ये रुग्ण सापडताच अधिकाऱ्याकडून परिसराची पाहणी करण्यात आली आहे.