दलित पँथरची राज्यभर पुर्नबांधणी करणार ; भूपेंद्र कांबळे | सभासद नोंदणी सुरू

0

जत,प्रतिनिधी : साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे,दलित पँथरचे संस्थापक पँथर राजाभाऊ ढाले यांच्या स्मृत्तीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले.जत नगरपरिषदेचे शिक्षण,क्रिडा व सांस्कृतिक सभापती भूपेंद्र कांबळे यांनी दोन्ही महापुरूषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
या मंगलदिनी विस्कळीत झालेली दलित चळवळ पुन्हा प्रभावीपणे उभी करण्यासाठी जत येथून सुरू करण्यात आली.राज्यभर प्रभावी असलेल्या दलित पँथर या संघटनेची पुर्नबांधणी करण्याचे शिवधनुष्य सभापती भूपेंद्र कांबळे यांनी उचलले आहे.या संघटनेची जत तालुक्याची कार्यकारी जाहीर करण्यात आली. ती अशी, तालुकाध्यक्ष पदी अमर कांबळे,उपाध्यक्ष पदी गिरीश सर्जे,कोषाध्यक्ष सुनिल कांबळे,सचिव विक्की वाघमारे यांच्या निवड करण्यात आली.यावेळी भूपेंद्र कांबळे म्हणाले,राज्यभर वेगळेपण दलित चळवळ उभी करत दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उभी राहिलेली दलित पँथर ही चळवळ गेल्या काही दिवसात विस्कळीत झाली आहे.पर्यायाने दलित समाजाचे प्रभावी न्याय देण्याची चळवळ कायम उभी राहावी,राज्यभर विस्कळीत असलेले दलित पँथर एकाच छताखाली आणून दलितावरील अन्याय,अत्याचारा विरोधात एक प्रभावी लढा उभारण्यासाठी आम्ही पुन्हा दलित पँथर चळवळीचा झेंडा खाद्यावर घेतला आहे.पँथरची ही चळवळ राज्यभर पुुन्हा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.पँथरच्या छताखाली दलित,दुर्लक्षित समाजातील युवक,मध्यमवर्गीय,महिला,वयोवृद्धांना न्याय मिळवून देण्याचा आमचा या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे.या दलित पँथरची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे,यात जास्तीत जास्त समाज बांधव,युवकांनी सहभागी व्हावे,असे आवाहनही कांबळे यांनी केले.


Rate Card


     अधिक माहितीसाठी भूपेंद्र कांबळे                 : 88885 40854जत येथील दलित पँथरच्या बैठकीत बोलताना नगरपरिषेदेचे सभापती भूपेंद्र कांबळे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.