जत कन्या कॉलेजची मालती वाघमोडे केंद्रात प्रथम

जत,प्रतिनिधी : बारावी बोर्ड परिक्षेत जत येथील कन्या हायस्कूल व श्री.दत्त उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत विद्यालयाची परंपरा कायम राखली.कला विभागाचा 80.35 टक्के लागला.यात मालती शंकर वाघमोडे हिने (88.61टक्के)गुण मिळवत जत केंद्रात प्रथम क्रंमाक पटकावित विद्यालयाच्या यशात आणखीन एक मानाचा तुरा रोवला.
द्वितीय लक्ष्मी विष्णू पवार(82.92 टक्के),तृत्तीय पुजा बाळू वगरे(79.38 टक्के)गुण मिळवत यश मिळविले.
दत्त ज्यू.कॉलेज हे जत शहरात फक्त मुलीसाठी चालविले जाणारे एकमेव विद्यालय आहे.
या विद्यालयात विद्यार्थींना संगणक प्रशिक्षण, ई-लर्निंग,प्रसिद्ध व्याख्यात्याचे व्याख्यान,विविध विषयाचे मार्गदर्शन, अद्यावत व्यायाम शाळा,त्यात वेगवेगळ्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येते.ज्यादा तास,सराव परिक्षा घेऊन विद्यार्थींनी गुणवत्ता तयारी करण्यात येते,अशी माहिती प्राचार्य नंदाताई पाटील यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थींनीना प्रा.ताई व्हनमाने,तृप्तीदेवी बावधनकर,किसन कोंडिकिरे,यांचे मार्गदर्शन लाभले.