सांगली महापालिका हद्दीत होणार घर टू घर आरोग्य तपासणी
साांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील 50 वर्षाच्या वरच्या नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणेसाठी आणि तपासणी करण्यासाठी सांगली महापालिकेने तयार केलेली घरनिहाय वैद्यकीय तपासणी पथक आज रवाना झाली. पुढील दहा या पथकाकडून वॉर्डनिहाय 50 वर्षावरील व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे.आज महापौर गीताताई सुतार आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत ही वैद्यकीय तपासणी पथकांची वाहने रवाना करण्यात आली.
या तपासणीसाठी 20 प्रभागाच्या 20 टीम तयार करण्यात आल्या असून यामध्ये एक समन्वयक अधिकारी सहायक समनव्यक अधिकारी,स्टाफ नर्स, आशा वर्कर यांचा समावेश आहे.अशी एकूण 100 कर्मचारी पुढील 10 दिवस मनपा क्षेत्रात 50 वर्षावरील नागरिकांची आरोग्याची माहिती घेत त्यांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये बीपी टेम्परेचर, श्वासोश्वास प्रमाण यांची तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर 50 वर्षावरील नागरिक आणि अति जोखमीचे लोक ज्यांना बीपी शुगर मूत्रपिंड, दमा या बरोबर ताप सर्दी खोकला दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास दररोज सायंकाळी 5 पर्यंत याबाबतचे रिपोर्टिंग पथकाकडून केले जाईल.

यानुसार वॉर्ड मेडिकल ऑफिसरला ही माहिती कळवले जाईल व वैद्यकीय पथक त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी बरोबर कोविड 19 ची चाचणी करणार आहेत. आज ही सर्व वाहने आपल्या पथकासह प्रभागमध्ये पाठवण्यात आली. यावेळी महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक , आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, कार्यशाळा प्रमुख विकास पाटील, महेश मदने आदी उपस्थित होते. यावेळी कोविड 19 ला रोखण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला सहकार्य करून योग्य आणि खरी माहिती द्यावी आणि तपासणी करून घ्यावी असे आवाहन मनपाच्या महापौर गीताताई सुतार, मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.