संख,वार्ताहर : संख परिसरातील शेतकऱ्यांसह,सर्व विज बिल माफ करा,वीज दरवाढ तात्काळ रद्द करा,अशा मागणीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अप्पर तहसीलदार यांना देण्यात आले.त्याचवेळी वाढीव विज बिलाची होळी करण्यात आली.कोरोनांच्या प्रादुर्भावामुळे संकट व लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी, व्यवसाय,घरगुती यांचे विज बिल भरणे मुश्किल झाले आहे.अशा बिकट परिस्थितीमुळे आपल्या कार्यालयाकडून झालेले वीज दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी.वीज बिल दुरुस्ती करून देण्यात यावी.
तात्काळ वीज दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यात यावेत अशा मागण्या करत वाढीव वीज बिलांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.विज बिल माफ नाही केले,तर महावितरनच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल,असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,उपविभाग संखचे उप कनिष्ठ अभियंता राजन यांनाही निवेदन देण्यात आले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नागनाथ शिळीन,उपाध्यक्ष राजकुमार बिरादार,युवा आघाडी अध्यक्ष सिध्दगोंडा बिरादार,तालूका युवा आघाडीध्यक्ष भिमाशंकर बिरादार,विश्वनाथ बिरादार व शेतकरी उपस्थित होते.संख ता.जत येथे विज दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.