राज्य सरकारने कोविड पॅकेज देऊन वीज बिल भरावे | डफळापूरात बिलाची होळीकरत आंदोलन
डफळापूर,वार्ताहर : लॉकडाऊनच्या काळात महावितरण यांच्याकडून आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले. वीज ग्राहकांनी रोष व्यक्त केल्यानंतर ऊन्हाळ्यासह कोरोना आणि वर्क फॉर्म होमवर वाढीव बिलाचे खापर सरकारने फोडले. मात्र या व्यतीरिक्त विजेच्या दरात झालेल्या वाढीमुळे देखील वीज ग्राहकांना मोठा शॉक बसला. परिणामी या वाढीव वीज दरासोबत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी राज्यभर वीज बिलांची होळी आंदोलन छेडण्यात आले होते.यावेळी आंदोलनकर्त्यांनी गेल्या 3 महिन्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी केली.
कर्नाटकातून जतला पाणी देण्यासंदर्भात दोन्ही राज्ये सकात्मक : ना.जयंत पाटील
आज डफळापूर महावितरण कार्यालयासमोरही वीज बिले होळी आंदोलन करण्यात आले.

यावेळी बळीराजा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण,युवा तालुकाध्यक्ष रघुनाथ माने,हर्षवर्धन चव्हाण,विठ्ठल चव्हाण,वैभव चव्हाण,गुंडा चव्हाण,रणजित वाघमारे,विलास चव्हाण, बाळासाहेब चव्हाण शेतकरी उपस्थित होते.कोरोना महामारी आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा 300 युनिटसच्या आत वीज वापर असणारे राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या 3 महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावी. या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने कोविड पॅकेज वा अनुदान स्वरूपात करावी इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सागर चव्हाण यांनी सांगितले.
डफळापूर ता.जत येथे वीज दरवाढ रद्द करावी म्हणून आंदोलन करण्यात आले.