जत,प्रतिनिधी : जत येथिल ठेकेदार आर.व्ही.मठ यांनी जत शहरात केलेल्या विविध कामे ही नियमबाह्य व निकृष्ट केलेली असून त्यांनी तालुक्यात केलेल्या रस्ते कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.त्यांच्या सर्व कामाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी व नियमबाह्य कामे करणारे ठेकेदार आर.व्ही.मठ यांचे नाव काळ्या यादीत टाकावे,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत येथील वादग्रस्त ठेकेदार आर.व्ही. मठ यांच्याकडून जत नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची खडीकरण व डांबरीकरणाची कामे नगरपरिषदेतील अधिकारी व पदाधिकारी यांच्या सांगण्यावरून केली आहेत.त्यातील अनेक रस्ते अगदी काही महिन्यातच उखडलेले आहे.त्यांच्याकडून कामे करताना कामाच्या ठिकाणी कामाची संपूर्ण माहिती असलेला मार्गदर्शक बोर्ड त्या ठिकाणी लावणे बंधनकारक असताना बोगस कामे घुसडण्यासाठी जाणिवपूर्वक लावले नाहीत. जत तालुक्यासह नगरपरिषद हद्दीत त्यांनी केलेली रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणची संपूर्ण कामे नियमबाह्य केली आहेत.
हेही वाचा ;
जत खड्ड्यात कुणी ढकलले | गटारीचे स्वरूप आलेल्या रस्ते कामाचे सत्य
जत नगरपरिषद हद्दीतील संभाजी भोसले घर ते ईदगाह मैदान या ठिकाणापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण ही कामे नियमबाह्य झाली आहेत. यामध्ये कोठेही सि.डी.वर्कचे काम समाविष्ट नसताना या कामात सबंधित ठेकेदार आर.व्ही.मठ यांनी तीन ठिकाणी रस्त्यामधे मोठ मोठ्या सिमेंट पाईपा टाकून नियमबाह्य अशी कामे केली आहेत.त्याचप्रमाणे पडोळकर घर ते ईदगाह मैदान या रस्त्याचे दक्षिण बाजूने पश्चिमेकडून पुर्वेला जत नगरपरिषदेने गटारी मंजूर केलेली असताना ही सबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे दक्षिण बाजूने दक्षिणेकडील असलेल्या वसाहतीतील रहिवाशांच्या ड्रेनेजचे सांडपाणी हे दक्षिण बाजूने मंजूर गटार मार्गाने वळविणे गरजेचे असताना ही त्यांने आपल्या नातेवाईकांच्या दारात या गटारीचे सांडपाणी साठते व त्याचा त्रास आपल्या नातेवाईकांना होतो, म्हणून सबंधित रस्त्याच्या कामात कोठेही सिमेंट पाईपा टाकण्याचे नसताना केवळ आपल्या नातेवाईकांच्या मर्जीखातर सबंधित ठेकेदार आर.व्ही.मठ यांनी नातेवाईकांच्या घराचे समोर या रस्त्याचे मध्ये कोणतेही सि.डी.वर्क मंजूर नसताना दांडगाव्याने दक्षिण/उत्तर अशा मोठ्या सिमेंट पाईपा टाकून नियमबाह्य सि.डी.वर्क बसविला आहे.
हेही वाचा ;
खड्डेच खड्डे चोहीकडे, डांबरी रस्ते गेले कुणीकडे… प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था
आर.व्ही.मठ या ठेकेदाराने ही नियमबाह्य कामे केल्याने याचा त्रास या रस्त्याचे उत्तर बाजूस असलेल्या वसाहतीमधिल नागरिकांना भोगावा लागत आहे.वरून आलेल्या ड्रेनेजचे सांडपाणी या वसाहतीमधिल रहिवाशांच्या घरासमोर पसरून त्यांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
ठेकेदार आर.व्ही. मठ यांनी जत शहरात केलेली खडीकरण व डांबरीकरणाची कामे अत्यंत निकृष्ठ व दर्जाहिन तसेच नियमबाह्य केली असून नियमबाह्य खडी व आईल मिश्रीत डांबराचा वापर करण्यात आला आहे.तसेच सि. डी. वर्कचे काम नसताना ही रस्त्याचे कामामध्ये सिमेंट पाईपा घालून त्यावर लोखंडी जाळी बसवून काॅन्करिटीकरण न करता केवळ सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे.त्यामुळे हा रस्ता जास्त दिवस टिकणार नाही.तसेच जत नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची खडीकरण व डांबरीकरणची कामे चालू असताना ही जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा,सबंधित प्रभागाचे नगरसेवक, नगरपरिषदेकडील अभियंता यांनी कामाचे ठिकाणी भेट दिली नाही. सबंधिताकडून ठेकेदार आर.व्ही.मठ यांना पाठीशी घालण्याचे काम होत असल्याने याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.
नातेवाईकासाठी सी डी वर्क घुसडला
मुख्य रस्त्याचे काम करताना मुळात रस्त्याच्या कामाच्या इस्टीमेंटमध्ये नसतानाही नातेवाईकाच्या घरासमोर सांडपाणी साठते म्हणून सी.डी.वर्क घुसडला आहे.अनेक रस्ते करताना असे सीडीवर्क गायब करणाऱ्या या ठेकेदाराला नातेवाईकाचे हित जोपण्यासाठी इतर नागरिकांवर सांडपाणी लादले आहे.तेथे सी डी वर्क केल्याने अन्य ठिकाणी हे सांडपाणी साठत असून तेथील नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.अशी नियबाह्य कामे होत असतानाही या ठेकेदाराला अभय कोणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.मठ या ठेकेदारांच्या सर्व कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही संजय कांबळे यांनी दिला आहे.
जत शहरातील ठेकेदारांना नातेवाईकांच्या हितासाठी गटारीचे पाणी विरूध दिशेला वळविले आहे.