कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

0
कानपूर :उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रसिध्द गुंड विकास दुबेचा पोलीसांशी झालेल्या चकमकीनंतर एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. 


विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथक कानपूर येथे आणत होते.परंतु वाटेत पोलिसांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडी पलटी झाली.गाडीतून खाली उतरत विकास दुबे पोलिसांची बंदूक हिसकाऊन घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला.या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

Rate Card

पोलीसावरील हल्ल्यानंतर देशभर चर्चेत आलेल्या दुबेने गुरुवारी, 9 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास उज्जैन येथील महाकाळ मंदिरात आत्मसमर्पण केले.त्यानंतर त्याला कानपुरकडे नेहण्यात येत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.