पाणी उशाला आणि कोरड घशाला | आंवढीकरांचे बेहाल ; तात्काळ काम पूर्ण करा : आण्णासाहेब कोडग

0

आवंढी,वार्ताहर : आवंढी ता.जत गावाला वरदान ठरणारी अतिशय महत्वाच्या म्हैशाळ योजनेचे बंधिस्त पाईपलाईनच्या काम अगदी संथ गतीने सुरू असून गावात सध्या पाणी टंचाई असून गतीने ही कामे करून आंवढी परिसरात पाणी सोडावे,अशी मागणी संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केली आहे.

Rate Card

म्हैसाळ योजनेच्या अंतराळ मुख्य कालव्यापासून बंदिस्त पाईपलाईन द्वारे अंतराळ,शिंदेवाडी,आवंढी,शिंगनहळ्ळी , मोकाशेवाडी या गावांना शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचे उद्घाटन आमदार,खासदार,म्हैशाळ  योजनेचेे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत  मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी ठेकेदार शिवानंद पाटील यांनी ही योजना 100 दिवसात पूर्ण करून सर्व गावांना शेतीसाठी पाणी देण्याचे अधिकाऱ्यांच्या समोर शब्द दिला होता.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.परंतु या योजनेची सुरवात होऊन जवळ जवळ दीड वर्ष होत आली आहेत.आजपर्यंत अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा पाईपलाईनचे काम अद्यापपर्यत पूर्ण झालेले नाही.म्हैशाळ योजनेचे पाणी  गावापासून चार किलोमीटर अंतरावरील भागात पोहचले आहे. मात्र आवंढी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु असतानाही हे काम करण्यास दिरगांई होत आहे.त्यामुळे पाणी उशाला आणि कोरड घशाला असे म्हणायची वेळ 

येथील ग्रामस्थासह,शेतकऱ्यांवर आली आहे. 

सातत्याने संबधित विभागाकडे पाठपुरवा करूनही ठेकेदारांकडून कामात गती आणली जात नाही.त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी वाळत आहेत.असे असताना भिमगर्जना केलेल्या ठेकेदाराला यांचे गांर्भिर्य नाही.योजनेचे तात्काळ गतीने काम करून आंवढी परिसरात पाणी सोडावे अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करू,असा इशारा कोडग यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिला.

आंवढीला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधिस्त पाईपलाईनचे काम संथगतीने सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.