भाजपा नेत्यांची दुकानदारी बंद पडल्याने आंदोलन | शेळकेची त्यांच्या विंनतीवरूनच बदली : कॉग्रेसचा संबध नाही

0

जत,प्रतिनिधी : भाजपचे पदाधिकारी हे पोलिसांचे एजंट असून पोलीस निरीक्षक रामदास शेळके याची बदली झाल्यामुळे त्याची दुकानदारी बंद पडलेली आहे, असा सणसणीत टोला कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पाराया बिराजदार व नगरसेवक भुपेंद्र कांबळे यांनी लगावला.

पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची त्याच्याच विनंतीनुसार बदली झाली आहे. तसं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार व त्यांचे कार्यकर्ते यांनी हा त्रास झाल्यामुळे माझी बदली झाली आहे. असे पत्रात नमूद केले आहे.काँग्रेसची बदनामी करणाऱ्या पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचेही बिराजदार,कांबळे यांनी सांगितले.

जत येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत केला. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार,नगरसेवक साहेबराव कोळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे नगरसेवक इराण्णा निडोनी, आप्पू माळी, संतोष भोसले उपस्थित होते. 

बिराजदार व कांबळे पुढे म्हणाले की, पोलीस निरीक्षक शेळके हे तालुक्यात काँग्रेस संपवण्याची सुपारी घेऊन आले होते.ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत होते. त्यांची विनंतीनुसार बदली झाली असताना भाजपच्या व इतर पक्षाच्या नेत्यांनी जत शहरवासीयांना वेठीस धरण्याचे कारण काय असा सवाल बिराजदार व कांबळे यांनी केला. याउलट भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे,उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे यांना त्रास देण्याचे काम केले होते,हे जगजाहीर आहे.भाजपचा आंदोलनाचा प्रकार हा चोराच्या उलट्या बोंबा असा आहे.

बिळूर येथील तरुण महानतेश पाटील तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीतून मृत्यू झाला होता.पण वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकरण धडपडायचे काम शेळके यांनी केली आहे. तसेच राहुल काळे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता.त्यांचे कुटूंबीय मृतदेह ताब्यात घेणास नकार दिला असता, त्यांना दमबाजी केली.मृतदेहाची हेळसांड केली म्हणून गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकून हे प्रकरण दडपवले आहे. 

तसेच संचार बंदीच्या काळात नाका बंदीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माया गोळा केली आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी कांबळे यांनी केली.

Rate Card

जर रामदास शेळके हे निर्दोष असतील त्यांनी चौकशीला सामोरे जावे असे आवाहन बिराजदार व कांबळे यांनी केले. भाजपचे बाळ सावंत, तालुकाध्यक्ष सुनील पवार, नरळे गुरुजी, बंडू कांबळे हे पोलिसांचे एजंट असल्याचा आरोप गंभीर बिराजदार व कांबळे यांनी केला. 

आमचे नेते आमदार विक्रमसिंह सावंत तालुक्याला पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करत आहे. दिड कोटी रुपयाची विकास कामे मंजूर करुन आणत,माजी आमदार विलासराव जगताप यांची ठेकेदारांना सांभाळायची पद्धत मोडीत काढत ज्या त्या ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग केला आहे.त्याचबरोबर वैद्यकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमदार फंडातून 20 लाख रुपयाचे साहित्य वाटप केले आले. 

आमदार सावंत यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. हिंमत असेल तर भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी त्यांच्या पत्नीचा सभापती पदाचा राजीनामा द्यावा त्यांनी बोलले तसं त्यांनी वागावे असा खोचक टोलाही बिराजदार व कांबळे यांनी लगावला.

तुबची बबलेश्वर योजनेसंदर्भात आमचे नेते आमदार सावंत हे सतत पाठपुरावा करत आहेत.सरदार पाटील हे कर्नाटकात भाजपचे सरकार आहे,हे सांगत आहेत.त्यांची हिंमत असेल तुबची- बबलेश्वर योजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करावा असे,आवाहनही बिराजदार व कांबळे यांनी केले.

काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे म्हणाले की, पोलिस निरीक्षक रामदास शेळके हे निर्दोष असतील तर त्यांनी पळून जायला नको पाहिजे होत,हिंमत असेल तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे.आमचे नेते आमदार सांवत यांनी कधीही गुंडगिरीला खतपाणी घातले नाही.माजी आमदार विलासराव जगताप यांनी मटकावाले,वाळूवाले व अवैद्य धंदे करणारे यांना नेहमी पाठीशी घातले आहेत ते आमदार असताना नगरपरिषदेला एका दमडीचा ही निधी दिला नाही.भाजपचे कार्यकर्त्यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.