डफळापूर परिसरातील वाळू तस्करीवर छापा | 17 ब्रॉस वाळू जप्त : तहसीलदार सचिन पाटील यांची कारवाई

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत पश्चिम भागात सुरू असलेल्या वाळू तस्करीला लगाम लावण्याची कारवाई तहसीलदार सचिन पाटील यांनी सुरू केली आहे.शुक्रवारी रात्री पाटील यांच्या पथकांने छापामारी केली.मात्र वाळू तस्करांने तेथून पळ काढला होता. शनिवारी सकाळी तहसीलदार पाटील यांनी जिरग्याळ मिरवाड परिसरात छापामारी केली.त्यावेळीही वाळू तस्करांनी वाहने घेऊन पळ काढला, मात्र त्यांनी गोळा केलेली सुमारे 17 ब्रास वाळू जप्त केली आहे.

जत पश्चिम भागात कुडणूर नंतर अंकले,बाज,बेंळूखी,डफळापूर,मिरवाड,जिरग्याळ गावातील ओढे,तलावे वाळू तस्करीचे अड्डे बनले आहेत.कोरोनामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अगदी दिवसाढवळ्या वाळू तस्करी सुरू आहे.यांची माहिती मिळताच तहसीलदार पाटील यांनी या वाळू तस्कराकडे मोर्चा वळविला आहे.गेल्या चार दिवसात तहसीलदार पाटील यांनी या भागात दोन वेळा छापामारी केली आहे.मात्र वाळू तस्कर वाहने पळवून नेहण्यात यशस्वी झाले आहेत.मात्र यापुढेही अशीच कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार पाटील यांनी दिला आहे.

गाववार पथके सक्रीय करणार

दरम्यान या भागात सुरू असलेल्या बेकायदा वाळू तस्करींनी ओढे,तलावे लुटण्याचा प्रकार होत असल्याचे स्पष्ट झाल्याने या परिसरातील गावागावात विशेष पथके नेमण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.