Untitled Post

0

जत:प्रतिनिधी.

 तालुक्यातील बिळूर येथील एका ३४ वर्षिय तरूणाला कोरोणाची लागण झाल्याने  व त्याचा कोरोना पाॅझीटीव्ह अहवाल आज आल्याने बिळूर येथील  कोरोनाग्रस्तांची संख्या ही सात झाली असून बिळूर येथिलच एका ४२ वर्षिय तरूणाचा काल  कोरोनाने बळी गेल्यामुळे बिळूर परिसरासह जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

      या बाबत सविस्तर माहिती अशी की जत तालुक्यातील बिळूर येथील एका इस्त्री व्यवसाईकाला कोरोना झाल्याने त्याच्या संपर्कात असलेल्या त्याची पत्नी व त्याच्यावर उपचार करणारे बिळूर येथिलच खासगी दवाखान्यातील एक डाॅक्टर व त्यांचा स्टाफ यांना प्रशासनाने काॅरंटाईन करून त्यांचा स्वॅब कोरोना तपासणी साठी घेतला असता. बाधित तरूणाच्या पत्नीचा व खासगी दवाखान्यातील दोन कर्मचारी यांचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे.

    .   दरम्यान बाधित व्यक्ती पैकी ४२ वर्षिय इस्त्री व्यवसाईक व्यक्तीचा मिरज येथिल एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचारादरम्यान  कोरोनाने बळी गेला आहे.

         दरम्यानच्या काळात मिरज येथिलच एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये  बिळूर येथील एका ६४ वर्षिय व्यक्तीला उपचारासाठी  दाखल केले असता ती व्यक्ती व त्या व्यक्तीच्या संपर्कातील त्याचा मुलगा व मुलगी यांचाही कोरोना तपासणी अहवाल कोरोना पाॅझीटीव्ह आल्याने बिळूर येथिल कोरोना बाधितांची संख्या ही सहा झाली आहे.

        नुकतेच बिळूर येथीलच बिळूर-बसरगी या रस्यावरील बिळूर व बसरगी या दोन गावांच्या मध्ये वस्ती असलेल्या मिरज येथील सांगली-मिरज रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या  एका ३४ वर्षिय व्यक्तीला कोरोना झाल्याचे आढळून आल्याने बिळूर येथील कोरोना बाधित रूग्णांची संख्या सात झाली आहे.

Rate Card

      या तरूणाला ही दारूचे व्यसन होते. या व्यसनातूनच ही व्यक्ती इस्त्री व्यवसाईक असलेल्या गावातीलच सबंधित कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आली होती. या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याने दोन दिवस अंगात ताप असतानाही दवाखान्यात न जाता ताप अंगावरच काढला. त्यानंतर ही व्यक्ती गावातीलच एका खासगी दवाखान्यात दोन दिवस अडमीट होती. तरीही या व्यक्तीचा ताप कमी न झाल्याने त्याला कर्नाटकातील अथणी येथील रूग्णालयात अडमीट केले होते. त्या ठिकाणी ही त्याचा ताप कमी न झाल्याने त्याला जत येथिल विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु येथेही त्याचा ताप कमी होण्याऐवजी जास्तच वाढल्याने त्याला मिरज येथिल सांगली-मिरजरस्त्यावर असलेल्या एका मोठ्या खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी या रूग्णांचा कोरोना तपासणी साठी स्वॅब घेण्यात आला. त्याचा तपासणी अहवाल आज पाॅझीटीव्ह आला आहे. या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील एका आशा वर्कर्स महिलेसह दोघांना प्रशासनाने मिरज येथिल कोविड रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलेआहे.

         बिळूर येथे सात कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बिळूर येथील कोरोना बाधित रूग्णांना कोरोनाची लागण कोणाचे संपर्कात  आल्यामुळे झाली आहे अजून समजले नाही.

       परंतु बिळूर येथील कोरोना बाधित व्यक्ती या दारूचे व्यसन असणारे व्यक्ती असून त्यांचा संपर्क दारू पिणारे व्यक्तीशी आल्यानेच या व्यक्तींना कोरोना झाला असल्याची तसेच यातील कोरोना बाधित इस्त्री व्यवसाईक  व्यक्ती ही द्राक्षे कटींग करीत असल्याने व ती बाहेरील द्राक्षे व्यापारी यांच्या संपर्कात आल्याने ही सबंधित व्यक्ती कोरोना बाधित झालेची शक्यता गावकरी व्यक्त करीत आहेत.

      कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. अभिजीत चौधरी यांनी  शुक्रवारी बिळूर गावाला भेट  देऊन परिस्थिती ची पहाणी केली व तालुका प्रशासन, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांना दक्षता व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.