सहाव्या वेतन आयोगातील शिक्षकांच्या फरक द्या ; शिक्षक भारतीचे निवेदन

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगातील फरकाचे पाच टप्पे करण्यात आले होते.त्यापैंकी काही शिक्षकांचे एक व दोनच हप्ते फंडला जमा आहेत. उर्वरित 3,4 व पाचवा हप्ता अद्याप जमा नाही, याबाबत शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी आर.डी. शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.

सन 2006 ला सहावा वेतन आयोग लागू झाला आहे आता सध्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची चारमा शिक्षकांच्या फंड खात्यावरती जमा होत आहे.मात्र सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या  रकमा अद्याप शिक्षकांच्या फंड खात्याला जमा नाहीत.याबाबत शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.यानिमित्ताने शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

गटशिक्षणाधिकारी आर डी शिंदे म्हणाले की,ज्या शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगातील फंडाच्या रखमा जमा नाहीत.आशा शिक्षकांनी केंद्रप्रमुखांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करावा,त्यानुसार त्यावेळचे शेडूल चेक करून जिल्हा परिषदेला पाठवले जाईल.

Rate Card

यावेळी शिक्षक भारतीचे मल्लय्या नांदगाव, इब्राहिम  शेख, नवनाथ संकपाळ, अनिल पाथरुथ , विनोद कांबळे, चौगुले एन आर इ पदाधिकारी उपस्थित होते.

जत तालुक्यातील शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमा जमा कराव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.