कोसारीत अवैध दारू पकडली | LCB ची कारवाई, बाकी अवैध धंद्याला अभय का ?
जत,प्रतिनिधी : दारूचे कोठार ठरत असलेल्या शेगाव ता.जत येथील दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दुचाकीवर छापा टाकत 40 हजार 908 रूपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अनेक महिन्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने डोंगर पोकरून ससा पकडण्याची ही कारवाई केली आहे. शेगाव येथून सुरू असलेली ही दारू वाहतूक गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.दररोज लाखो रूपयाची दारूची वाहतूक होत असताना जत पोलीसांना दिसत नाही हे विशेष.स्थानिक अन्वेषण भागाकडून किरकोळ कारवाई म्हणजे दिखाऊ पणा असल्याचा आरोप होत आहे.शेगाव येथून संजय सहदेव बुरूटे (वय 40,रा.शेगाव) हा कोसारीकडे मोटार सायकलवरून 180 मिलीचे 384 बॉटल कोसारी कडे नेहत असताना गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याला पकड़तही ही कारवाई केली.दुचाकीसह संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान जत शहरासह तालुक्यात अवैध धंदे बेधडक चालू आहेत.स्थानिक पोलीस,व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांकडून थेट हप्ते वसूली केली जात असल्याने तालुकाभर उघड्यावर अवैध धंदे चालू आहे.सर्वजणाचे हप्ते सैट असल्याने एकाही अवैध धंद्यावर कारवाई केली जात नाही.सिंघम स्टाईलने सुरूवात केलेल्या अधिकारीही अवैध धंद्याबाबत हाताची घडी,तोंडावर बोट असे स्थितीत आहेत.तर या धंद्यातील वसुली नेमलेल्या कलेक्टर कडून सर्व अवैध धंदे चालकाकडून हप्ते वसूली केली जात असल्याची चर्चा आहे.