मक्ररसंक्रांतीच्या पुर्वसंध्येला बाजारात गर्दी

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : मकरसंक्रांतीचा सण शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिम‌ित्त तिळ-गुळासह आकर्षक पतंगांनी बाजारपेठ सजली आहे. संक्रातीच्या पूर्वसंध्येला तिळगुळ, काळ्या रंगाचे कपडे, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासांठीच्या भेट वस्तू घेण्यासाठी बाजारात मह‌िलांची झुंबड उडाली होती.नव्या वर्षातील मकरसंक्रांत हा पहिला सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो, त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. मकर संक्रांतीची जत शहरात तयारी सुरू झाली आहे. हिवाळ्यात तिळ व गुळ या पदार्थांचे सेवन शर‌िरासाठी पौष्टीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी तिळगुळ देऊन ऐकमेकांना सुभेच्छा दिल्या जातात. यासह संक्रांतीसाठी तिळ व गुळाच्या पदार्थांमध्ये चिक्की, लाडू देखील तयार केले जातात. हे पदार्थ बाजारात रेड‌िमेडही मिळतात. बाजरात या पार्श्वभूमीवर तिळ व गुळाची मोठी आवक झाली आहे.मकर संक्रांतीच्या सणाच्या अगोदर एक दिवस अगोदर येणा-या भोगीसाठी पारंपारीक पध्दतीने घरोघरी बाजरीची भाकरी, विविध भाज्या, असे पदार्थ बनविण्यात येतात. त्यामुळे शहरात भाज्या, तीळ, बाजरी, राळे, गाजर आदींच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होत आहे. भाज्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रातीकडे पाहिले जाते. भोगी दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर गाजर, कांदा पात, हळदी-कुंकु वाण (सुगड), तीळ-गुळ, तिळाचे दागिने खरेदी करीत संक्रातीच्या सणाची तयारी केली. तीळ-गुळाबरोबर सुवासिनीचे वाण देण्यासाठी विविध वस्तू खरेदीसाठी महिलांची बाजारात झुंबड उडाली आहे. मकर संक्रातीला सुवासिनी वाणामध्ये ओटीचे साहित्य, बिब्याची माळ, खाऊची पाने, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, डहाळे, ऊस, बोर घालून, पुजन सुगडावर हळदी कुंकु वाहतात आणि ववश्याचे पुजन करतात. संक्रातीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करून एकमेकांना तिळ-गुळ देऊन स्नेह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

असे आहेत दर

तिळ 150 ते 200 रुपये किलो, हलवा (तिळगुळ) 60 रुपये किलो, तिळेचे लाडू 200 रुपये किलो,चिक्की 160 रुपये किलो.भाज्यात सर्वत भाज्या आंशी रूपये किलो रूपयात उपलब्ध होत्या.हरबरा एका जूडीला वीस रूप यापर्यत दर वाढला होता.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.