शालेय पोषण आहार जबाबदारीत मुख्याध्यापकांना दोषी धरू नये ; शिक्षक भारती

0
Rate Card

माडग्याळ, वार्ताहर : जिल्हा परिषद शाळातील शालेय पोषण आहार जबाबदारीत मुख्याध्यापकांना दोषी धरण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

शिक्षक भारती शिष्ट मंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी वाखारे यांची शिक्षकांच्या प्रश्नांबाबत भेट घेतली.शालेय पोषण आहार जबाबदारीतून मुख्याध्यापकांना मुक्त करणेबाबत दि.26 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील शाळांत शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने बचत गटाची निवड करून त्याची सर्वस्वी जबाबदारी बचत गटाकडे सोपविण्याची कार्यवाही करण्याचा शासन निर्णय आहे.निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा झाल्यास अथवा विषबाधा झाल्यास,नोंदी नुसार शिल्लक माल व प्रत्यक्ष माल यामध्ये तफावत आढळल्यास  याला मुख्याध्यापक जबाबदार असणार नाही .शालेय पोषण आहार मालाची मागणी नोंदविणे,माल तपासून ताब्यात घेणे,मालाच्या नोंदी करणे ही सर्व कामे बचत गटाकडे आहेत.26 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयाची प्रत निवेदनासोबत देण्यात आली. शालेय पोषण आहार भरारी पथकाने मुख्याध्यापकांना दोषी धरू नये अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मँडम यांच्याकडे केली.यावेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,कादर अत्तार ,दीपक काळे,कृष्णा पोळ,सुरेश खारकांडे,दिगंबर सावंत,महेंद्र माने,चंद्रशेखर क्षीरसागर ,संजयकुमार कवठेकर,दिपक शितोळे,शहानवाज मणेर,किशोर कांबळे,मल्लया नांदगांव,विनोद कांबळे,नवनाथ संकपाळ,बाळासाहेब सोलनकर,प्रताप पवार,विजय जाधव,माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने रतन कुंभार,आरिफ गोलंदाज हे शिक्षक भारती पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली : शिक्षकांच्या विविध मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.